माणसाला पैशांची गरज कधी पडेल काही सांगता येत नाही. अचानक पैशांची गरज लागते तेव्हा वैयक्तिक कर्ज किंवा क्रेडिट कार्डच्या सहाय्याने पैसा उभा केला जातो. मात्र यासाठी मोठ्या प्रमाणावर व्याजाचा आकारणी केली जाते. पण आता LIC स्वस्त व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देत आहे.
तुमच्याजवळ LIC पॉलिसी असेल तर तुम्हाला स्वस्त व्याजदरावर कर्ज मिळेल. यासाठी कोणत्याही गॅरंटीची आवश्यकता नाही.
LIC सुद्धा मनी बँक आणि एन्डाउमेंट प्लॅनवर कर्जपुरवठा करते. LIC पॉलिसीवर 9 ते 10 टक्के व्याजदराने कर्ज मिळतं. तर वैयक्तिक कर्ज किंवा क्रेडिट कार्डवर घेतलेल्या कर्जाची परतफेड 14 ते 15 टक्के व्याजदराने करावी लागते.
तुमच्या पॉलिसीवर वार्षिक 7 ते 8 टक्के रिटर्न मिळत असेल तर कर्जाचे व्याज फक्त 1 ते 2 टक्के इतकंच उरतं. LIC च्या माध्यमातून कर्ज घेण्याची एक चांगली बाब ही आहे की पॉलिसीच्या मुदतीत कर्ज घेता येतं.
तसेच या कर्जाची परतफेड करताना मुद्दल आणि व्याज सोयीनुसार भरता येतं.